‘पुष्पा भावे : समकालीन आणि अभिजात’ - वाचकांना समृद्ध करणारा पुष्पा भावे यांच्या जीवनकार्यावर टाकलेला प्रकाशझोत...
निडर सामाजिक कार्यकर्त्या आणि झुंजार रणरागिणी अशी पुष्पा भावे यांची ख्याती होती. या पुस्तकातून पुष्पाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत, राजकीय स्थित्यंतरात एक प्रामाणिक, परखड भूमिका घेऊन समतावादी, लोकशाहीवादी विचारांचा जागर करण्याचं काम पुष्पाबाईंनी आयुष्यभर केलं. हक्क आणि अधिकारांसाठी त्यांनी सदैव संघर्ष केला.......